इस्लामपुरात खून; दोघांना केली अटक

By admin | Published: February 14, 2016 12:49 AM2016-02-14T00:49:37+5:302016-02-14T00:49:37+5:30

दोन वर्षांनी छडा : दोघांना कोठडी

Islamophobia murder; Both arrested and arrested | इस्लामपुरात खून; दोघांना केली अटक

इस्लामपुरात खून; दोघांना केली अटक

Next

इस्लामपूर : शहरातील बस स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या एका कॉम्प्लेक्समधील रत्नाकर बँकेचे ए.टी.एम. यंत्र फोडण्यास विरोध करणाऱ्या ७0 वर्षीय वृध्दाच्या झालेल्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन वर्षानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. येथील न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी दिली आहे.
सुखदेव ज्ञानदेव पवार (वय ७0, रा. तडवळे, ता. शिराळा) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ७ एप्रिल २०१४ रोजी सकाळी ही खुनाची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र महावीर खोत (वय २५ रा. इस्लामपूर), सद्दाम राजू कुमठे (वय २२, रा. इस्लामपूर) या दोघांना अटक केली आहे. यातील सलमान शेख हा तिसरा संशयित फरारी आहे.
या घटनेची माहिती अशी, बस स्थानकाशेजारील कॉम्प्लेक्समध्ये सुखदेव पवार हे सुरक्षारक्षक म्हणून काम पाहात होते. २0१४ मध्ये ६ एप्रिलच्या रात्री ते ७ एप्रिलच्या पहाटेदरम्यान संशयितांनी येथील ए.टी.एम. यंत्र फोडले होते. त्यावेळी पवार यांनी विरोध केल्याने त्यांच्या डोक्यात अवजड शस्त्राने प्रहार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. या खूनाच्या घटनेनंतर एकच खळबळ उढाली होती. परंतु, पोलीसांच्या तपासाला अखेर यश आले आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षानंतर हा गुन्हा उघडकीस आला. न्यायालयाने रवींद्र खोत याला १५, तर सद्दाम कुमठे याला १७ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एल. राठोड अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Islamophobia murder; Both arrested and arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.