इस्लामपूर बसस्थानक घाणीचे भांडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:27+5:302021-03-22T04:23:27+5:30

इस्लामपूर आगारात दोन मोठ्या कचरा कुंड्या असून नसल्यासारख्या आहेत. अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोना महामारीत ...

Islampur bus stand dirt depot | इस्लामपूर बसस्थानक घाणीचे भांडार

इस्लामपूर बसस्थानक घाणीचे भांडार

googlenewsNext

इस्लामपूर आगारात दोन मोठ्या कचरा कुंड्या असून नसल्यासारख्या आहेत.

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोना महामारीत राज्य परिवहन विभागाकडे बसस्थानकातील स्वच्छतेसाठी फंड नाही, असे सांगितले जाते. त्यातच पालिकेचा आरोग्य विभागच कोमात आहे. त्यामुळे बसस्थानक आणि परिसरात घाणीचे भांडार बनले आहे.

इस्लामपूर पालिकेची शनिवार दि. २१ रोजी सभा पार पडली. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी फक्त टिवल्याबावल्याचा खेळ केला. त्यांना जनतेच्या सुख-सुविधेशी काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. मुख्य चौकासह उपनगरांतील गटारी जागोजागी तुंबल्या आहेत. त्या विभागातील नगरसेवक आणि नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच गटारी उपसल्या जातात. याहून कहर म्हणजे इस्लामपूर बसस्थानकातील अस्वच्छता पाहिली असता, प्रवासी आणि कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानकातील निम्म्याहून अधिक जागेत गाजरगवताची झुडपे वाढली आहेत. त्याचठिकाणी कचरा टाकण्यासाठी दोन मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्या कुंड्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. त्यामुळे त्यात टाकलेल् कचरा त्या परिसरात पसरला असून त्याची दुर्गंधी येऊ लागली आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याचे याकडे दुर्लक्ष असून वेळोवेळी कचरा उचलला जात नसल्याने बसस्थानक परिसरातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.

बसस्थानकातील स्वच्छता करणाऱ्या कामगारांची संख्या पाहता वेळेवर स्वच्छता केली जात नाही. सकाळच्या सत्रात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात कचरा दिसतो. तो वेळेवर काढला जात नाही. प्रत्येक प्लॅटफाॅर्मवर छोट्याशा कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. त्याही कचऱ्याने भरलेल्या असतात. बरेच शौकिन प्रवासी त्या ठिकाणीच थुुंकतात. याकडे आगार प्रमुख आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच पालिकेचा आरोग्य विभागही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा अभाव आहे.

Web Title: Islampur bus stand dirt depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.