इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:09 PM2019-06-14T19:09:52+5:302019-06-14T19:18:38+5:30
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे आणि जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी कामाला लागावे, असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्यात खलबते झाली.
अशोक पाटील ।
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे आणि जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी कामाला लागावे, असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्यात खलबते झाली. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुक असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांनी शिवसेनेशी संपर्क सुरू केला आहे.
शुक्रवार, दि. १४ रोजी उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक ह्यमातोश्रीह्णवर आयोजित केली आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजप-शिवसेना युती होणार आहे. दोन्ही पक्षांनी समान १३५ जागा लढविण्याचा, तर इतर १८ जागा घटकपक्षांना देण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने इतर पक्षांतील नेते अस्वस्थ झाले आहेत. महाडिक गटाचे राहुल महाडिक येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सध्या ते कोणत्याही पक्षात नाहीत. त्यामुळे त्यांनी ह्यमातोश्रीह्णवरील वाºया वाढवल्या आहेत.
आता नव्याने इच्छुकांमध्ये पृथ्वीराज पवार यांची भर पडली आहे. त्यांनीही शिवसेनेच्या तिकिटावर दावा केला आहे. हुतात्मा संकुलाचे युवा नेते गौरव नायकवडी यांनी सर्व पक्षांना समान अंतरावर ठेवले आहे. त्यांना भाजपने ह्यआॅफरह्ण दिली असली तरी, इस्लामपूरमधून निवडणूक लढवायची झाल्यास त्यांना शिवसेना प्रवेश अनिवार्य राहील. या इच्छुकांव्यतिरिक्त काहींनी शिवसेनेच्या तिकिटासाठी कोलांटउड्या घेण्याचीही तयारी केली आहे.