इस्लामपुरात ठेकेदारास कैद
By admin | Published: March 6, 2016 11:22 PM2016-03-06T23:22:52+5:302016-03-07T00:37:55+5:30
६५ लाखांचा दंड : बनावट धनादेशप्रकरणी आदेश
इस्लामपूर : शहरातील सराफ व्यावसायिक बाळासाहेब पोरवाल यांना ६0 लाख रुपयांचा बनावट धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदारास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुहास भोसले यांनी ६ महिने साधी कैद आणि ६५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेश रामू राठोड (वय ३४, रा. राजेबागेश्वरनगर, आदिती पॅकिंगसमोर, इस्लामपूर) असे शिक्षा झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. दंडाची रक्कम न दिल्यास त्याला आणखी दोन महिने कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. फिर्यादी पोरवाल यांच्यावतीने अॅड. विजय खरात यांनी काम पाहिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, बाळासाहेब पोरवाल यांची ९ वाहने विक्री करावयाची होती. सप्टेंबर २0१२ मध्ये सुरेश राठोड यांना ही वाहने लेखी करारपत्राने ३ कोटी ६0 लाख रुपयांना विक्री करण्याचे निश्चित झाले होते. करारपत्राप्रमाणे सात वर्षे प्रत्येकी ६0 लाख रुपयांच्या हप्त्याने राठोड याने रक्कम द्यायची होती. पहिला हप्ता ३0 सप्टेंबर २0१२ रोजी देण्याचे ठरले होते. मात्र त्याने दिलेला धनादेश न वठता परत आला. (वार्ताहर)
१२ लाखांचा धनादेश
राठोड याने कराड जनता सहकारी बँकेच्या इस्लामपूर शाखेवरील १२ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र तो न वठता परत आल्याने, बाळासाहेब पोरवाल यांनी येथील न्यायालयात राठोडविरुध्द दावा केला होता.