तायक्वांदो स्पर्धेवर इस्लामपूरचे वर्चस्व
By admin | Published: July 12, 2015 10:54 PM2015-07-12T22:54:24+5:302015-07-12T22:54:24+5:30
राज्य स्पर्धा धुळ्यात : सांगली जिल्हा संघ जाहीर
हरिपूर : जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत इस्लामपूरच्या लोकनेते राजारामबापू अॅकॅडमीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत वर्चस्व मिळवले. तायक्वांदो असोसिएशन आॅफ सांगलीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून सांगली जिल्हा संघाची निवड करण्यात आली. वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात स्पर्धा पार पडली. जिल्ह्यातून शंभरपेक्षा अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. उद्घाटन मनपाचे क्रीडाधिकारी नितीन शिंदे व क्रीडा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी कामगार कल्याण निरीक्षक सचिन खराटे होते. तायक्वांदो असोसिएशनचे सरचिटणीस सुरेश चौधरी यांनी संयोजन केले. यावेळी डॉ. सुहास व्हटकर, शार्दुल तरापले, सचिन जाधव, सुभाष खिलारे, सुनील खिलारे आदी उपस्थित होते. स्पर्धेचा अनुक्रमे एक ते चार क्रमांकाचा अंतिम निकाल असा : मुले : १८ किलो : ओम कारंडे (इस्लामपूर), सार्थक शिंदे (मिरज), यश सातपुते (मिरज), ओम देशमुख (आटपाडी). २१ किलो : सुमित जाधव (मिरज), अमित जाधव (मिरज), मोहन देशमुख (आटपाडी), आदित्य पाटील (इस्लामपूर). मुली : २४ किलो : सुहानी शिनगारे (येलूर), तन्वी जगताप (मिरज), अर्पिता तरापले (इस्लामपूर), प्राची मुजराडे (इस्लापूर). २९ किलो : मनस्वी भंडारी (इस्लामपूर), गौरी घोडके (खंडेराजुरी), उर्मिला मलमे (मिरज), वैष्णवी चौधरी (सांगली). विजेत्यांची धुळे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पंच म्हणून अनिल पवार, सुषमा चंदनशिवे, क्रांती आवळे, भीमा मुळके, आकाश कुचीवाले यांनी काम पाहिले.
(वार्ताहर)