इस्लामपूर जायंटस सहेली ग्रुपचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:43+5:302021-01-08T05:26:43+5:30
इस्लामपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेलीतर्फे जिल्हा परिषद शाळेतील सामाजिक उपक्रमशीलता जोपासणाऱ्या चार ...
इस्लामपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेलीतर्फे जिल्हा परिषद शाळेतील सामाजिक उपक्रमशीलता जोपासणाऱ्या चार महिला शिक्षकांना आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार जाहीर केले.
नंदिनी भागवत गायकवाड (इस्लामपूर, शाळा नं. १), अस्मिता अरुण पाटील (खुंदलापूर शाळा), आयेशा इकबाल नदाफ (तुजारपूर शाळा) व सुवर्णा सदाशिव बच्चे (कांदे शाळा नं. १) या शिक्षिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
यावेळी जायंटस सहेलीच्या अध्यक्षा प्रफुल्ला शहा, रचना शिंदे, श्रद्धा कुलकर्णी, संगीता शहा, कविता शहा, गौरी परमणे, नगरसेविका सुनीता सपकाळ, चारुशीला फल्ले, वैदेही भोसले, प्रतिभा शहा उपस्थित होत्या.
स्त्री शिक्षणाच्या चळवळीमध्ये सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे.
महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यात सावित्रीबाई फुले यांचा सहभाग जाणीव करून देणारा होता म्हणून प्रत्येक वर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जायंटस सहेलीकडून कर्तृत्ववान महिला शिक्षिकांना आदर्श पुरस्कार दिले जातात, असे अध्यक्षा प्रफुल्ला शहा यांनी सांगितले.
फोटो
०४०१२०२१-आयएसएलएम-नंदिनी गायकवाड,
०४०१२०२१-आयएसएलएम-अस्मिता पाटील
०४०१२०२१-आयएसएलएम-आयेशा नदाफ ०४०१२०२१-आयएसएलएम-सुवर्णा बच्चे