इस्लामपूर पालिकेने चुकीची करवसुली त्वरित थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:09+5:302021-09-23T04:30:09+5:30
इस्लामपूर येथे उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना गजानन पाटील, बाळासाहेब गायकवाड यांनी निवेदन दिले. या वेळी अजित जाधव, शेखर खांडेकर ...
इस्लामपूर येथे उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना गजानन पाटील, बाळासाहेब गायकवाड यांनी निवेदन दिले. या वेळी अजित जाधव, शेखर खांडेकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील मालमत्ताधारकांना चुकीची बिले देऊन सुरू असलेली वसुली त्वरित थांबवावी. पालिकेच्या दुकानगाळ्यांची अनामत रक्कम व भाडे माफक स्वरुपाचे करून लिलाव प्रक्रियेत शहरातील नागिरकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन गजानन पाटील, बाळासाहेब गायकवाड, अजित जाधव, शेखर खांडेकर यांनी पालिकेच्या उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना दिले आहे.
या निवेदनात शहरात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटारी योजनेच्या कामाची गुणनियंत्रण दक्षता पथकाकडून तपासणी करावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील वाहनांचे पार्किंग बंद करावे. गटारींवरील अनधिकृत बांधकामे आणि वाहतुकीची कोंडी करणारे रस्त्यावरील अनधिकृत विक्रेते यांच्यावर कारवाई करावी. रस्ते व गटारींचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी. या मागण्या मान्य न झाल्यास १ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.