इस्लामपुरात वाहतूक पोलिसास धक्काबुक्की करणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:50+5:302021-01-09T04:22:50+5:30
इस्लामपूर : मद्यपान करून भरधाव वेगाने मालट्रक घेऊन निघालेल्या चालकाचा थरारक पाठलाग करत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मद्यपी चालकास ...
इस्लामपूर : मद्यपान करून भरधाव वेगाने मालट्रक घेऊन निघालेल्या चालकाचा थरारक पाठलाग करत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मद्यपी चालकास ताब्यात घेतले. कामेरी नाका, आष्टा नाका ते वाळवा फाटा इतक्या अंतरापर्यंत हा पाठलाग सुरू होता. हा प्रकार गुरूवारी दुपारी घडला. या ट्रकचालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्यासह वाहतूक अधिनियमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाहतूक पोलीस किरण विक्रम मस्के यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरख शिवाजी काशीद (रा. नराळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) या मद्यपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. काशीद हा मद्यपान करून आपल्या ताब्यातील मालट्रक (क्र. एमएच १२-केपी- ३९९१) घेऊन सांगलीकडे जात होता. वाहतुकीस अडथळा होईल या पद्धतीने त्याने कामेरी नाका येथे ट्रक उभा केला होता. वाहतूक शाखेच्या मस्के यांनी त्याला वाहन बाजूला घेण्यास सांगत असता काशीद याने उद्धटपणे आपला ट्रक घेऊन भरधाव वेगाने निघाला. वाळवा फाटा येथे त्याला थांबविल्यानंतर त्याने वाहतूक पोलिसांशी वाद घालत उद्धट वर्तन केले. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करत आहेत.