इस्लामपुरात महिला काँग्रेसने रुग्णांना दिला मदतीचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:41+5:302021-05-24T04:26:41+5:30
इस्लामपूर : प्रदेश महिला काँग्रेसच्या संकल्पनेतून कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी ‘एक घास मदतीचा’ या उपक्रमात रविवारी येथील ...
इस्लामपूर : प्रदेश महिला काँग्रेसच्या संकल्पनेतून कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी ‘एक घास मदतीचा’ या उपक्रमात रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयामधील रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांना, तसेच पोलिसांना जेवणाचे पॅकेट देण्यात आले.
प्रदेश सरचिटणीस मनीषा रोटे म्हणाल्या, महिला काँग्रेसचा एक घास मदतीचा हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये विविध भागांमध्ये चालू राहील. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून हा उपक्रम होत आहे. महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हाताने जेवण बनवून गरजू लोकांना जेवणाचे डबे दिले आहेत.
यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, आर. आर. पाटील, अनिस जमादार, मानव अधिकार संघटनेचे विनायक पेटकर, डॉ. राणोजी शिंदे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रंजना माळी, उपाध्यक्ष लता नवले, शहराध्यक्ष इंदुताई चौधरी रचना शिंदे उपस्थित होत्या.
फोटो-
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला काँग्रेसच्या मनीषा रोटे, राजेंद्र शिंदे, डॉ. राणोजी शिंदे, रंजना माळी, अनिस जमादार यांच्या हस्ते रुग्णांना भोजन देण्यात आले.