इस्लामपुरात थोडा है... थोडे की जरूरत है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:27+5:302021-05-09T04:26:27+5:30

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व नगरसेकांच्या मदतीने पालिकेची यंत्रणा कार्यान्वित ठेवली आहे. शिवाय प्रकाश हॉस्पिटलच्या ...

Islampurat is a little ... a little is needed | इस्लामपुरात थोडा है... थोडे की जरूरत है

इस्लामपुरात थोडा है... थोडे की जरूरत है

googlenewsNext

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व नगरसेकांच्या मदतीने पालिकेची यंत्रणा कार्यान्वित ठेवली आहे. शिवाय प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

भाजप नेते राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक युवाशक्ती कार्यरत आहेत. या माध्यमातून माजी नगरसेवक कपिल ओसवाल व नगरसेवक अमित ओसवाल यांनी गरजूंसाठी ५५ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय दोन ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देणार आहेत. तसेच निराधारांना जीवनावश्यक किट व औषधे दिली जात आहेत.

ही कामे एका बाजूला होत असली तरी गत वर्षी कोरोना काळात गरजू नागरिक व रुग्णांच्या मदतीसाठी अनेक हात धावले तशी यावेळी परिस्थिती दिसून येत नाही. तालुक्यात नेत्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात वजन आहे. आज रुग्णांना रुग्णालायात बेडसाठी झगडावे लागत आहे. गरजूंना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यास मात्र नेत्यांची ताकद कमी पडताना दिसून येत आहे.

Web Title: Islampurat is a little ... a little is needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.