वाळव्याच्या शाळेला ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:41 AM2019-06-23T00:41:25+5:302019-06-23T00:42:20+5:30

वाळवा केंद्रातील चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे सोमवारी शाळेच्या पहिल्यादिवशीच शाळा व्यवस्थापन समितीचे

 The 'ISO' | वाळव्याच्या शाळेला ‘आयएसओ’

वाळवा येथील चांदोली शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक सुरेश बसुगडे यांचा सुरेश पाटील यांनी सत्कार केला. यावेळी आनंदी पाटील, सरिता हारे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देग्रामीण भागांमध्ये आता आशा शाळांची गरज आहे.

महेंद्र किणीकर ।

वाळवा : वाळवा केंद्रातील चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे सोमवारी शाळेच्या पहिल्यादिवशीच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. अखंड एक वर्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी अथक् परिश्रम घेतले आणि हे मानांकन मिळविले आहे.

धरणग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या या शाळेस आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त होते. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून १७३ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. आज वर्गातील पटसंख्या टिकवून ठेवण्यात तारेवरची कसरत करावी लागणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना ही शाळा म्हणजे दीपस्तंभ होय. ग्रामीण भागांमध्ये आता आशा शाळांची गरज आहे.

यासाठी वाळवा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, विस्तार अधिकारी आंबी, केंद्रप्रमुख नजमा पिरजादे, सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बसुगडे, शिक्षिका आनंदी पाटील, शशिकला थोरात, जयादेवी मोटे, सरिता होरे, कल्पना खवरे, प्रभावती पाटील यांनी परिश्रम घेतले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद अहिर, ग्रामपंचायत सदस्य व चांदोली धरणग्रस्तांचे नेते उमेश कानडे, सुरेश पाटील, शिक्षक समितीचे अध्यक्ष राहुल पाटणे, प्रमोद गुरव यांचे शाळेच्या उपक्रमांना सहकार्य लाभले.

अत्याधुनिक साधने
आयएसओ मिळविण्याच्यादृष्टीने शाळेने विद्यार्थ्यांना सर्व ती अत्याधुनिक साधने उपलब्ध करून दिली आहेत. डिजिटल वर्ग, सुसज्ज क्रीडांगण, रंगरंगोटी, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, योग्य अध्यापन, वेगवेगळ्या म्हणी व कविता यांनी रंगविलेल्या भिंती, तसेच विविध उपक्रम शाळेने वर्षभर राबविले, तेच आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.


 

Web Title:  The 'ISO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.