महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:00+5:302021-03-25T04:25:00+5:30
ओळी : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते हे प्रमाणपत्र आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे ...
ओळी :
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते हे प्रमाणपत्र आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. या प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते आयुक्त नितीन कापडणीस यांना सुुपूर्द करण्यात आले.
महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला. २०१९ मध्ये आलेल्या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यावर आयुक्तांनी भर दिला. त्यासाठी मंगलधाम संकुलात स्वतंत्र यंत्रणा उभारली. नदीच्या पाण्याची पातळी, पुराच्या कक्षेत येणाऱ्या परिसरावर सीसीटीव्हीद्वारे वाॅच ठेवला जात आहे. पुराच्या संभाव्य धोक्याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठीही आपत्ती कक्षात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुरासह शहरातील सर्वच आपत्ती निवारणाचे काम या कक्षातून सुरू आहे. या कक्षाला आयएसओ ९००१ हे मानांकन मिळाले आहे.
या मानांकन प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांना हे मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, सिस्टिम मॅनेजर नकुल जकाते आदी उपस्थित होते.