बागणीतील कर्मवीर विद्यालयास आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:58+5:302021-01-23T04:26:58+5:30
बागणी : कर्मवीर हे फक्त नाव नाही तर हा एक विचार आहे. त्यांच्या विचारावर प्रत्येक माणूस जगू शकतो. त्यांच्या ...
बागणी : कर्मवीर हे फक्त नाव नाही तर हा एक विचार आहे. त्यांच्या विचारावर प्रत्येक माणूस जगू शकतो. त्यांच्या विचारांचा जागर हा प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील आयएसओ ऑडिटर लक्ष्मीकांत साधू यांनी केले.
बागणी (ता. वाळवा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. साधू यांनी आयएसओ मानांकनाचे निकष सांगितले. मुख्याध्यापक केसरे यांनी शाळेतील केलेले आमूलाग्र बदल याची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेस पाच हजार रुपयांची देणगी दिली तर खटाव सातारा येथील वसतिगृहातील अपघातग्रस्त विद्यार्थ्याला देखील पाच हजारांचा धनादेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल. बी. माळी होते. बागणी सरपंच संतोष घनवट, काकाचीवाडी सरपंच प्रमोद माने, उपसरपंच विष्णू किरतसिंग, शरद जामदार, दुधगाव शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा दरेकर, प्रा. तानाजीराव कदमबांडे, एस. बी. भोसले, पुष्पा जंगम, एस. डी. मिरजकर, एस. डी. येसुगडे, आर. व्ही. माने, बी. एस. पाटील, एम. व्ही. देवकाते, ए. एस. तोडकर, ए. बी. महाजन, ए. एस. नरुटे, व्ही. एस. जाधव, ए. डी. पाटील, एस. ए. कणसे, बी. एस. पाटील उपस्थित होते.
फोटो -२२०१२०२१-आयएसएलएम-बागणी कर्मवीर आयएसओ न्यूज
बागणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मुख्याध्यापक यशवंत केसरे यांना ऑडिटर लक्ष्मीकांत साधू यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सरपंच संतोष घनवट, प्रमोद माने, लक्ष्मणराव माळी, विष्णू किरतसिंग व शिक्षक उपस्थित होते.