आष्टा येथील वसाहतींचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:41+5:302020-12-31T04:26:41+5:30

आष्टा : आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सचिव नितीन करीर यांच्याशी मुंबई ...

The issue of settlements at Ashta will be resolved | आष्टा येथील वसाहतींचा प्रश्न मार्गी लावणार

आष्टा येथील वसाहतींचा प्रश्न मार्गी लावणार

googlenewsNext

आष्टा : आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सचिव नितीन करीर यांच्याशी मुंबई येथे लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तत्पूर्वी प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी शिबिर घेऊन प्लॉटधारकांना किती रक्कम भरावी लागते, याची माहिती द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

जयंत पाटील यांनी आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगर येथे ‘जनता दरबार’ घेऊन नागरिकांशी संवाद साधत नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी प्रतीक पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, झुंझारराव पाटील, दिलीपराव वग्याणी, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, मुख्याधिकारी कैलास चव्हाण, अर्जुन माने, मनीषा जाधव, समीर गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्री जयंत पाटील म्हणाले, हा बरेच वर्षे प्रलंबित प्रश्न आहे. येथे १४०० मालमत्ताधारक व ३०० दुकानगाळे आहेत. जमीन हस्तांतरण प्रक्रिया दीर्घकालीन आणि किचकट असून, यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने तीन पर्याय दिलेले आहेत. कोणाला जादा तोशिष न लागता जमीन हस्तांतर व्हावी, असे वाटते.

प्रांताधिकारी पाटील यांनी नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. नगरसेवक धैर्यशील शिंदे, अर्जुन माने, सतीश माळी, बाबा सिद्ध यांच्यासह बूथ अध्यक्षांनी प्रश्न मांडले.

यावेळी विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे उपस्थित होते.

फोटो ओळी- ३०१२२०२०-आयएसएलएम-आष्टा दत्त वसाहत न्यूज

: आष्टा येथील जनता दरबारात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार करताना नगरसेवक अर्जुन माने, मनीषा जाधव, प्रतीक, प्रांताधिकारी नागेश पाटील, झुंझारराव पाटील उपस्थित होते.

Web Title: The issue of settlements at Ashta will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.