सांगलीत १ टक्काही उद्योग सुरू होणे मुश्कील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:02 PM2020-04-15T17:02:37+5:302020-04-15T17:03:37+5:30
हा मालही अन्य जिल्ह्यात, राज्यात, परदेशात जात असतो. याशिवाय कामगारांच्या उपलब्धतेचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना येथील उद्योजकांना करावा लागतो. स्थानिक पातळीवर माल तयार करून तो स्थानिक बाजारपेठेत विक्री करणाºया उद्योगांची संख्या एक टक्काच आहे. त्यांनाही कामगारांच्या अडचणीस तोंड द्यावे लागणार आहे.
अविनाश कोळी ।
सांगली : जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार केला तर, शिथिलता मिळाल्यानंतरही येथील एक टक्काही उद्योग सुरू होणे मुश्किल आहे. कच्च्या मालाची आयात आणि उत्पादित मालाची निर्यात तसेच कामगारांचा प्रश्न अडचणीचा बनला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये परिस्थितीनुसार निर्बंध कमी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये याविषयीच्या अडचणींची चर्चा सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील उद्योगांसमोर देशातील लॉकडाऊन हटेपर्यंत अनेक अडचणी निर्माण होणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड या शहरी भागात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. याठिकाणी सुमारे १ हजार २०० कारखाने आहेत.
मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांनीही या वसाहती भरल्या आहेत. अॅटोमोबाईल उद्योगांसाठी लागणाºया स्पेअर पार्टस्चे कारखाने, फाऊंड्री (धातू वितळविणारे कारखाने), यंत्रमाग, फूड इंडस्ट्री, सिमेंट आर्टिकल्स, अॅनिमल फूड अशाप्रकारचे उद्योग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा राजस्थान, पंजाब, कोलकाता, सूरत, लुधियाना, रायपूर, चेन्नई, मुंबई येथून येत असतो. आता कच्च्या मालाची उपलब्धता नाही. तयार केलेल्या मालाला पुन्हा बाजारपेठेचा प्रश्न येणार आहे.