हेलपाटे मारून शेतकरी दमले, ‘सन्मान’ दूरच, पदरी निराशाच

By अविनाश कोळी | Published: January 6, 2023 06:13 PM2023-01-06T18:13:21+5:302023-01-06T18:13:47+5:30

सांगली जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ शेतकरी लाभार्थी

It is far from getting respect in the Farmers Samman Yojana Farmers do not get simple information | हेलपाटे मारून शेतकरी दमले, ‘सन्मान’ दूरच, पदरी निराशाच

संग्रहीत फोटो

googlenewsNext

अविनाश कोळी

सांगली : शेतकरी सन्मान योजनेत सन्मान मिळणे तर दूरच साधी माहितीही व्यवस्थित मिळत नसल्याने लाभार्थींच्या पदरी निराशा येत आहे. अर्जातील त्रुटी दूर करुन पेन्शन पूर्ववत करण्यासाठी हजारो शेतकरी सध्या महसूल व कृषी विभागाचे उंबरठे झिजवून थकले आहेत. योजनेची जबाबदारी नेमकी आहे तरी कुणाची, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

शेतकरी सन्मान योजनेतील गोंधळ गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागाकडे सुरुवातीला याचा डाटा होता. शासनाने कृषी विभागाकडे ही योजना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्यक्षात योजना अद्याप हस्तांतरित झाली नाही. तरीही दोन्ही विभागात यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जाण्यास सांगतात, तर कृषी विभागाकडून महसूल विभागाकडे बोट दाखविले जाते. यात शेतकरी फसला आहे.

अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन केवायसी करण्यास जमत नसल्यामुळे त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेच विशेष मोहीम घेऊन अपूर्ण केवायसी पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याचा धोका आहे.

४,३६,६४५ लाभार्थींची जिल्ह्यात नोंद

जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ शेतकरी लाभार्थी म्हणून नोंद आहेत. १३ व्या हप्त्यासाठी केवायसी पूर्ण असलेल्या लाभार्थींची संख्या ३ लाख २० हजार ४३१ इतकी आहे.

Web Title: It is far from getting respect in the Farmers Samman Yojana Farmers do not get simple information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.