कुटुंबीय, ग्रामस्थांच्या साथीने अधिकारीपदाला गवसणी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:49 AM2021-02-18T04:49:16+5:302021-02-18T04:49:16+5:30

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळ व सायनाकर कुटुंबीय यांच्यावतीने इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्याहस्ते ...

It is possible to get the post with the help of family and villagers | कुटुंबीय, ग्रामस्थांच्या साथीने अधिकारीपदाला गवसणी शक्य

कुटुंबीय, ग्रामस्थांच्या साथीने अधिकारीपदाला गवसणी शक्य

Next

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळ व सायनाकर कुटुंबीय यांच्यावतीने इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्याहस्ते सावंत यांना 'जागृती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, सरपंच राजेश कांबळे, उपसरपंच दीपक घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत कोकाटे म्हणाले, परिस्थितीची जाण ठेवणारी माणसेच आयुष्यात यशस्वी होत असतात. मुलीची आई ही मैत्रीण, तर मुलाचे वडील हे मित्र झाले पाहिजेत, तरच कुटुंबाचा सुसंवाद टिकून राहील. मोबाईल, इंटरनेटमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माणसे एकत्रित आली, पण सतत त्यातच अडकल्याने घरची माणसे दुरावत आहेत.

प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी प्रास्ताविक केले. सुहास सावंत, वनिता मोहिते व निवास पवार यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. स्वाती मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री राजहंस यांनी आभार मानले. यावेळी जगुताई सावंत, सुजाता सावंत, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ सावंत, रमेश पाटील, भरत कदम, अशोक गोडसे, महादेव सावंत उपस्थित होते.

फोटो : १७ शिरटे १

ओळ : भवानीनगर (ता. वाळवा) येथे श्रीमंत कोकाटे यांच्याहस्ते दीपक सावंत यांना ‘जागृती’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी दीपक घाडगे, राजेंद्र कांबळे, सुजाता सावंत, जगुताई सावंत उपस्थित होत्या.

Web Title: It is possible to get the post with the help of family and villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.