महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:27+5:302020-12-31T04:27:27+5:30
आष्टा : महिलांनी स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, प्रसिद्धी व मार्केटिंगसाठी मार्गदर्शन करू, अशी ग्वाही ...
आष्टा : महिलांनी स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, प्रसिद्धी व मार्केटिंगसाठी मार्गदर्शन करू, अशी ग्वाही प्रतीक पाटील यांनी दिली.
कारंदवाडी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने महिलासाठी फॅशन डिझाईन व ब्युटीपार्लर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा गौरव व मागासवर्गीय राखीव निधीमधून गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे प्रमुख उपस्थित होते.
संभाजी कचरे म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून कारंदवाडी गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. यावेळी सरपंच पद्मजा कबाडे, रमेश हाके, श्रीकांत कबाडे, रघुनाथ हक्के, जालिंदर हाके, सदाशिव लवटे आदी उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर पाटील यांनी आभार मानले.
फोटो-३०आष्टा१
फोटो ओळ : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे फॅशन डिझाईन व ब्युटीपार्लर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा गौरव प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संभाजी कचरे, पद्मजा कबाडे, माणिक लवटे, सुधीर पाटील उपस्थित होते.