जे. व्ही. मोटर्समध्ये टाटा सफारीचे ग्राहकांना वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:59+5:302021-03-20T04:24:59+5:30
यावेळी जे. व्ही. मोटर्सचे संचालक विवेक सावंत, सेल्स एक्झिक्युटीव्ह ऑफिसर गुरविंदर सिंग, बिझनेस हेड नितीन बनावणे, जनरल मॅनेजर शरद ...
यावेळी जे. व्ही. मोटर्सचे संचालक विवेक सावंत, सेल्स एक्झिक्युटीव्ह ऑफिसर गुरविंदर सिंग, बिझनेस हेड नितीन बनावणे, जनरल मॅनेजर शरद जोशी, सर्व्हिस मॅनेजर अशोक भागवत, अराफत देसाई, स्वप्नील कुरणे, चतुरंगचे प्रशांत कुलकर्णी व महेश कराडकर, वैजनाथ महाजन कुटुंबीय व सुनील शिखरे कुटुंबीय उपस्थित होते.
टाटाची सफारी ही आतापर्यंतची सर्वात बहुप्रतीक्षित कार आहे. प्रीमिअम एस. यू. व्हीमध्ये सात सिटमध्ये उपलब्ध आहे. टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही आहे. कारचा स्पोर्टी लूक देण्यासाठी एक्स्टिरियरमध्ये काही बदल केले आहेत. कारला हार्बर ब्लू कलरमध्ये आणले आहे. याशिवाय कारमध्ये नवीन ग्रिलचा वापर करण्यात आला आहे. या कारमध्ये हॅरियरप्रमाणे अलॉय व्हील्ज दिले आहेत. तसेच कारमध्ये पॅनारमिक सनरुफ दिले आहेत. या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये २.० लिटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन १७० एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार चार व्हील ड्राइव्ह सिस्टमसोबत येते. नवीन टाटा सफारी ३ रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये ६-७ जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रीमिअम फिचर्स दिले आहेत. दरम्यान, कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वांत बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.
फोटो-१९सांगली०१
फोटो ओळ : जे. व्ही. मोटर्समध्ये टाटाची सफारी प्रथम ग्राहक निरज महाजन व राजश्री सुनील शिखरे यांना वितरण करताना जे. व्ही. मोटर्सचे विवेक सावंत, गुरविंदर सिंग, नितीन बनावणे व शरद जोशी आदी मान्यवर.