जगदीशच्या निधनाने शरीरसाैष्ठव क्षेत्रात पाेकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:11+5:302021-05-03T04:22:11+5:30
कुंडल (ता. पलूस) येथे शरीरसाैष्ठवपटू जगदीश लाड आणि शिरीष पवार यांना शाेकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार लाड म्हणाले, ...
कुंडल (ता. पलूस) येथे शरीरसाैष्ठवपटू जगदीश लाड आणि शिरीष पवार यांना शाेकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार लाड म्हणाले, कोरोनाचा कहर वाढतच आहे. जगदीशसारखा बलदंड माणूस त्याच्यासमाेर हरला. हे लक्षात घेऊन सर्वांनी काेराेनाबाबत सर्व पातळीवर काळजी घ्यावी.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड म्हणाले, जगदीश कुंडलचा अभिमान होता. त्याने कुंडलचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचवले. पंचायत समिती उपसभापती अरुण पवार म्हणाले, कोरोनाच्या महामारीत जगदीशसारखे मौल्यवान रत्न हरपले. तब्बेत असूनही त्याच्यावर कोरोनाने घाला घातला. प्रसंग वाईट आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. जिल्हा परिषद सदस्य शरद लाड म्हणाले, कुंडलचे वैभव हरपले. जगदीशने कमी वयात मोठं स्थान मिळविले होते. कोणताही त्रास होत असेल तर अंगावर काढू नये हाच धडा यातून आपण घेतला पाहिजे.
उद्योजक उदय लाड म्हणाले, वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळे जगदीश नेहमी सामान्य जनतेशी जोडून राहिला होता.
यावेळी दिनकर लाड, रणजित लाड, विक्रांत लाड, वसंत लाड, महारुद्र जंगम, प्रीतम लाड, रवींद्र लाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फाेटाे : ०२ पलूस २
ओळ : कुंडल (ता. पलूस) येथे आयाेजित शाेकसभेत अरुण लाड यांनी जगदीश लाड यांना श्रद्धांजली वाहिली.