सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर

By संतोष भिसे | Published: October 28, 2022 02:00 PM2022-10-28T14:00:45+5:302022-10-28T14:05:50+5:30

हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली नसली, तरी नवा गूळ येऊ लागला आहे.

Jaggery, Turmeric and Currant Deals Launched in Sangli Agricultural Produce Market Committee on Diwali Padwa Mahurt | सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर

सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर

Next

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या महुर्तावर गूळ, हळद आणि बेदाण्याच्या सौद्यांचा शुभारंभ झाला. प्रशासक मंगेश सुरवसे, आणि सचिव महेश चव्हाण यांच्यासह माजी संचालक बाळासाहेब बंडगर, मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, व्यापारी गोपाल मर्दा आदी उपस्थित होते.

मुहुर्ताच्या सौद्यामध्ये गुळाला ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला. हळदीला ८ हजार ७५० रुपये, तर बेदाण्याला २०१ रुपये भाव मिळाला. हा दर समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मुहुर्तावर सौद्यासाठ गोदामातील बेदाणा शेतकऱ्यांनी बाजारात आणला होता.

सांगलीत हळदीची मोठी बाजारपेठ आहे. मात्र यंदा हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली नाही. नवा गूळ मात्र बाजारात येऊ लागला आहे. गुळाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: Jaggery, Turmeric and Currant Deals Launched in Sangli Agricultural Produce Market Committee on Diwali Padwa Mahurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.