जलजीवन मिशन योजना!, सांगली जिल्ह्यातील ९६ हजार कुटुंबांना कधी मिळणार पाणी?

By अशोक डोंबाळे | Published: August 12, 2023 06:43 PM2023-08-12T18:43:49+5:302023-08-12T18:44:16+5:30

कोट्यवधींचा निधी; कामांत हवी पारदर्शकता

Jaljeevan Mission Yojana, When will 96 thousand families of Sangli district get water | जलजीवन मिशन योजना!, सांगली जिल्ह्यातील ९६ हजार कुटुंबांना कधी मिळणार पाणी?

जलजीवन मिशन योजना!, सांगली जिल्ह्यातील ९६ हजार कुटुंबांना कधी मिळणार पाणी?

googlenewsNext

सांगली : जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळ योजनेद्वारे थेट घरापर्यंत पाणी देण्यासाठी योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात सध्या ६८१ ग्रामपंचायतींत ६८३ कामे सुरू आहेत. अद्याप ९६ हजार १९३ कुटुंबे नळ योजनेच्या पाण्यापासून दूर आहेत. त्यांना २०२४ पूर्वी पाणी मिळणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील १०० टक्के कुटुंबांना २०२४ पर्यंत थेट नळद्वारे पाणी देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६८१ गावांसाठी ६८३ पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. या योजनांसाठी शासनाकडून ६६७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी सध्या १७६ गावांमधील योजनांची कामे अपूर्ण आहेत. 

कोट्यवधींचा निधी; कामांत हवी पारदर्शकता

जिल्ह्याच्या दुष्काळी दुर्गम भागात योजना प्रभावीपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेसाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तेव्हा त्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे. परंतु, काही ठेकेदार केवळ पैसे उकळण्याच्या हेतूनेच काम करीत असून निकृष्ट दर्जाची पाइप, पाइपलाइन खुदाची उंची कमी ठेवणे यासह आदी कामांत त्रुटी ठेवून पैसे उकळण्याचा उद्योग करत आहेत. अशा ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.

Web Title: Jaljeevan Mission Yojana, When will 96 thousand families of Sangli district get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.