जंबूराव शिरोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:02+5:302020-12-16T04:40:02+5:30
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील आदर्श शिक्षक जंबूराव भाऊ शिरोटे (वय १०१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ...
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील आदर्श शिक्षक जंबूराव भाऊ शिरोटे (वय १०१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण आणि सामाजिक कार्यात ते अग्रेसर हाेते. जंबूराव शिरोटे गुरुजी यांच्या प्रयत्नाने १९६२ मध्ये नागाव कवठे जिल्हा परिषद शाळेच्या कामकाजामुळे नागाव कवठेस जिल्ह्यातील पहिला ‘ग्राम गौरव’ पुरस्कार मिळाला. जैन समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये तेे सहभागी असत. पंचकल्याण महोत्सव, धार्मिक, सामाजिक उपक्रमांमध्ये ते अग्रभागी असत. २००५-०६ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. शिक्षण, सामाजिक, राजकीय, सहकार अशा सर्व क्षेत्रांत निकोप आणि सदाचारी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, जावई, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फाेटाे : १५ जंबूराव शिराेटे निधन