शिवाजीराव देशमुख यांना जनसागराचा साश्रू निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:06 AM2019-01-16T00:06:20+5:302019-01-16T00:06:24+5:30
शिराळा/ कोकरूड/ बिळाशी : अढळ पक्षनिष्ठा, स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ...
शिराळा/ कोकरूड/ बिळाशी : अढळ पक्षनिष्ठा, स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार शिवाजीराव देशमुख यांच्यावर कोकरूड येथे शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी राज्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
कोकरूड येथील हिराई निवासात शिवाजीराव देशमुख यांचे पार्थिव दुपारी दीड वाजता आणण्यात आले. याठिकाणी धार्मिक विधी करून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. याठिकाणी महिला, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी सरोजिनीदेवी देशमुख, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार संजय दत्त, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, रेणुकादेवी देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख, डॉ. पृथ्वीराज पाटील, संपतराव देशमुख, रामराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी विजयकुमार कळम-पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार शीतलकुमार यादव, तामिळनाडू राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आनंदराव पाटील, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर, पी. आर. पाटील, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, शरद पाटील, शैलजाभाभी पाटील, विशाल पाटील, बाळासाहेब पाटील, सुरेशराव चव्हाण, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, उदयसिंगराव नाईक, आमदार त्र्यंबक भिसे, दिनकरराव पाटील, भगवानराव साळुंखे, पृथ्वीराज पाटील, सुरेश पाटील, सत्यजित तांबे, सुमनताई पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे उपस्थित होते.