जत, उमदी पोलिसांकडून सीमाभागातील रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:39+5:302021-05-06T04:27:39+5:30

ओळ : जत तालुक्याच्या पूर्वभागातील जालिहाळ खुर्द ते ऐगनाळ सीमा मुरूम, काटे टाकून बंद करण्यात आला आहे. लोकमत ...

Jat, border roads closed by Umadi police | जत, उमदी पोलिसांकडून सीमाभागातील रस्ते बंद

जत, उमदी पोलिसांकडून सीमाभागातील रस्ते बंद

Next

ओळ : जत तालुक्याच्या पूर्वभागातील जालिहाळ खुर्द ते ऐगनाळ सीमा मुरूम, काटे टाकून बंद करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पोलीस, आरोग्य आणि महसूल यंत्रणा अलर्ट झाली आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जत, उमदी पोलिसांनी कर्नाटक सीमा रस्त्यावर माती, मुरूम, काटे टाकून रस्ते बंद केले आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

तालुक्याच्या उत्तरेला सोलापूर जिल्हा हद्द आणि दक्षिणेला बेळगाव जिल्हा हद्द लागते. पूर्वभागाला विजापूर जिल्ह्याची व दक्षिणेला बेळगाव जिल्ह्याची हद्द आहे. विजापूर, इंडी, अथणी तालुक्यांच्या सीमा लागून आहेत. सुसलाद, अक्कळवाडी, कोणबगी, धुळकरवाडी, मुचंडी, कागनरी, उमदी, सिद्धनाथ, उमराणी, सोनलगी, रावळगुंडवाडी, गुलगुंजनाळ, जालीहाळ खुर्द कोंतवबोबलाद या गावापासून कर्नाटकाला जोडणारी सीमा आहेत.

कर्नाटक सीमेला जोडणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मास्क न वापरणाऱ्यावर कार्यवाही केली जात आहे.

सीमेवर पोलीस, होमगार्ड यांचा पहारा असणार आहे. जीवनावश्यक वस्तू, माल वाहतुकीला परवानगी आहे.

सीमाभागातील कागनरी ते यत्नाळ, ढोकळेवाडी जालगिरीतांडा, धुळकरवाडी ते घोणसगी, जालीहाळ खुर्द ते ऐगनाळ, सिद्धनाथ ते कनमडी, कोंतवबोबलाद ते विजापूर, उमराणी ते ककमरी हे रस्ते खोदून, माती, मुरुम, काटे टाकून बंद केले आहेत.

तिकोंडी ते यत्नाळ, मुचंडी ते कनमडी, कोंतवबोबलाद ते विजापूर,उमदी- चडचण, कोकणगाव या रस्त्यावर बॅरेकेटस लावण्यात आले आहेत.

Web Title: Jat, border roads closed by Umadi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.