दुष्काळाच्या यादीत जतचे नाव नसल्याने तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 10:46 AM2023-11-01T10:46:37+5:302023-11-01T10:53:04+5:30
हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
जत : दुष्काळाच्या यादीत जत तालुक्याचा समावेश नसल्याने प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात तेल तहसीलदार यांची जीपच्या काचा फोडल्या आहेत. हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
अद्यापही गाडीच्या नुकसानीचा अहवाल मिळाला नसून किमान 20 हजाराचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.
मराठा आरक्षणासाठी काल जत तालुक्यातील मुचंडी जवळ कर्नाटक एसटी बस फोडण्यात आली होती तर आज सकाळी लवकरच तहसीलदार यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. दुष्काळाच्या यादीत जत तालुक्याचा समावेश नसल्याने हे कृत्य केले. तहसीलदार जीवन बनसोडे यांची शासकीय जीप क्रमांक एम एच १० इ ७४५ ही दररोज रात्री तहसील कार्यालयाच्या आवारातच लावण्यात येत असते. बुधवारी सकाळी लवकरच या गाडीच्या सर्वच बाजूच्या काचा फोडण्यात आल्या. यात वीस हजाराचे नुकसान झाले असावे असा अंदाज असून अध्यापक कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.