जत तालुक्यात चुरशीने ---- टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:51+5:302021-01-16T04:30:51+5:30
जत : किरकोळ बाचाबाची व शाब्दिक चकमकी वगळता जत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ...... टक्के इतके शांततेत मतदान ...
जत : किरकोळ बाचाबाची व शाब्दिक चकमकी वगळता जत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ...... टक्के इतके शांततेत मतदान झाले आहे. मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. १८ जानेवारी रोजी जत येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी करण्यात येणार आहे.
डोर्ली, गुड्डापूर, शेगाव, सिंगनहळ्ळी, उमराणी, उटगी, वळसंग या लक्षवेधी निवडणूक होत असलेल्या ७ ग्रामपंचायतींमध्ये चुरशीने मतदान झाले. ...... मतदानाचा वेग कमी होता. परंतु साडेअकरानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा वेग हळूहळू वाढत गेला. सायंकाळी साडेपाच वाजताही मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. सर्व पॅनल प्रमुख व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना घरातूनच व शेतातून मतदान केंद्रावर आणून मतदान करून घेतले. त्यामुळे मतदानाची सरासरी टक्केवारी वाढली आहे. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता सर्वांच्या नजरा निवडणूक निकालाकडे लागल्या आहेत. यापूर्वी टोणेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. सकाळी साडेनऊपर्यंत १४.०७ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत ३३.६२ टक्के, दुपारी दीड वाजेपर्यंत ५४.४७ टक्के, साडेतीन वाजेपर्यंत ७२.५६ टक्के व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ...... टक्के इतके मतदान झाले होते.