औपचारिकतेच्या कोरड्या पात्रात ‘जलजागृती’ची नौका

By Admin | Published: March 16, 2016 08:28 AM2016-03-16T08:28:55+5:302016-03-16T08:30:08+5:30

ठोस नियोजनाची गरज : दिखावू कार्यक्रमांपेक्षा पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न आवश्यक--

Javanagruti yacht boats in the dry air of formalities | औपचारिकतेच्या कोरड्या पात्रात ‘जलजागृती’ची नौका

औपचारिकतेच्या कोरड्या पात्रात ‘जलजागृती’ची नौका

googlenewsNext


 
शरद जाधव -- सांगली
दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचे ऐन हिवाळ्यातच उघडे पडणारे पात्र... दुष्काळी भागातील जनतेचा बारोमास पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष... प्रदूषणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने पाणी दूषित होण्याने चांगल्या पाण्याची होणारी गटारगंगा... ही सध्याच्या पाण्याची स्थिती, तर दुसरीकडे पाण्याचा वारेमाप वापर वाढल्याने क्षारपड जमिनीत होणारी वाढ आणि योजनेतून सोडण्यात येणारे हजारो लिटर पाणी वाया जाते, हे दोन्ही विरोधाभास आपणच निर्माण करीत असताना, पाणी म्हणजे एक मौल्यवान वस्तू म्हणून त्याकडे समाजाने पाहण्याची मानसिकता तयार करण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्यानेच ‘जलसप्ताहा’सारखे सोपस्कार पूर्ण करण्याची वेळ आल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

Web Title: Javanagruti yacht boats in the dry air of formalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.