मंत्री जयंत पाटलांकडून लसीचे 2 डोस घेणाऱ्या 108 वर्षीय आजीचा साडी चोळीनं सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 04:19 PM2021-06-07T16:19:48+5:302021-06-07T16:43:44+5:30
मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने 'लवकर आलास...' अशी हाक देत मायेनं विचारपूसही केली.
सांगली - कोरोनाने भल्याभल्यांना घाम फोडला, मात्र इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना आजीने कोरोनाला आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. याउलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने जीवनाशी लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल १०८ वर्षीय जरीना आजीचा साडीचोळी देऊन सत्कारही केला.
मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने 'लवकर आलास...' अशी हाक देत मायेनं विचारपूसही केली. इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे दाखवून दिलं. त्यामुळे लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
आमच्या इस्लामपूर शहरातील १०८ वर्षीय जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाविरुद्ध या लढ्यात सहभागी व्हावे. pic.twitter.com/DnUxWgxcS8
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2021