वाळव्यात जयंत पाटील यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:57+5:302021-07-25T04:22:57+5:30

वाळवा : जलसंपदा मंत्री जयंत पाटील व खासदार धैर्यशील माने यांनी शिरगाव व वाळव्यातील हाळभाग परिसरात बोटीच्या साहाय्याने पूरस्थितीची ...

Jayant Patil inspects the situation in the desert | वाळव्यात जयंत पाटील यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी

वाळव्यात जयंत पाटील यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी

Next

वाळवा : जलसंपदा मंत्री जयंत पाटील व खासदार धैर्यशील माने यांनी शिरगाव व वाळव्यातील हाळभाग परिसरात बोटीच्या साहाय्याने पूरस्थितीची पाहणी केली.

शिरगाव येथील नागरिकांना एनडीआरएफच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

वाळवा ग्रामपंचायतीने गुरुवारी रात्री १२ वाजताच नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे ८० टक्के नागरिक व जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले आहे. हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनीही सर्वत्र भेटी देऊन सहकार्य केले आहे.

हुतात्मा कारखाना व वाळवा ग्रामपंचायतीने पूरग्रस्तांच्या जेवणासह निवाऱ्याची सोय केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही मदतकार्यात व्यस्त हाेते. उपसभापती नेताजी पाटील यांनीही मदतकार्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे.

Web Title: Jayant Patil inspects the situation in the desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.