Sangli: इस्लामपूर मतदारसंघात 'जयंतगड' २१ हजार मतांनी ढासळणार, निशिकांत पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:39 PM2024-09-19T16:39:19+5:302024-09-19T16:41:08+5:30

महायुतीकडून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली

Jayant Patil will be defeated in Islampur constituency BJP district president Nishikant Patil claim | Sangli: इस्लामपूर मतदारसंघात 'जयंतगड' २१ हजार मतांनी ढासळणार, निशिकांत पाटील यांचा दावा

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात 'जयंतगड' २१ हजार मतांनी ढासळणार, निशिकांत पाटील यांचा दावा

अशोक पाटील

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात असलेला जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आगामी विधानसभेला २१ हजार मतांनी ढासळेल, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. महायुतीतून उमेदवार अद्याप निश्चित नाही. परंतु, आपण गेल्या ५ वर्षापासून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. महायुतीकडून एकास एकउमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गेल्या काही वर्षांत इस्लामपूर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. भाजप-शिवसेना यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागात कोट्यवधीचा निधी उपलब्ध दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी भाजपमधील अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गत निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहता महायुतीकडून मीच उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असेन, असा विश्वास निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील यांना थेट आव्हान

गणेशोत्सवानिमित्ताने आमदार जयंत पाटील यांनी राज्यभर संपर्क साधत आपले लक्ष इस्लामपूर मतदारसंघावर केंद्रित केले होते. त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनीही मतदारसंघात आपला संपर्क वाढवला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाची राज्य पातळीवर उंची वाढली. तरी मतदारसंघात मात्र विरोधक आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. विशेषत: निशिकांत पाटील यांनी थेट आव्हान दिल्याने लढत चुरशीची होणार आहे.

जयंत पाटील यांचा राज्यासह मतदारसंघातील प्रत्येक घराघरापर्यंत संपर्क आहे. गेली ३५ वर्षे संघटनात्मक कार्यकर्त्यांची बांधणी यासह सहकारी संस्थांचे जाळे भक्कम आहे. गेल्या ७ निवडणुकांमध्ये भले-भले गाजावाजा करणारे पक्षनेते मतदारांनी पाहिले आहेत. परंतु जयंत पाटील यांचे मताधिक्य वाढतच जाईल. - विजय पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, वाळवा तालुका.

Web Title: Jayant Patil will be defeated in Islampur constituency BJP district president Nishikant Patil claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.