इस्लामपूर शहराच्या विकासकामात जयंत पाटील घालणार लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:40+5:302020-12-06T04:28:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरात रस्त्याचा प्रश्न गंभीर असून, काही भागात पिण्याचे पाणी कमी पडते. भुयारी गटारीचे काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरात रस्त्याचा प्रश्न गंभीर असून, काही भागात पिण्याचे पाणी कमी पडते. भुयारी गटारीचे काम अपूर्ण असल्याने नागरिक चिकुनगुन्या, डेंग्यूसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. राज्य सरकारकडून शहरातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला असून, शहराच्या विकास कामात लक्ष घालणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
शहरातील गणेश मंडई, मोरे कॉलनी, उदय चौक येथे बैठका घेऊन त्यांनी सामान्य नागरिकांशी संवाद साधला. यावेळी युवा नेते प्रतीक पाटील, प्रा. शामराव पाटील, भगवान पाटील, खंडेराव जाधव, महिला शहराध्यक्ष रोझा किणीकर, अरुण कांबळे, संदीप पाटील, नगरसेवक आनंदराव मलगुंडे, नगरसेविका सुनीता सपकाळ, जयश्री माळी उपस्थित होते. यावेळी राज्य धनगर समाज महासंघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष ॲड. चिमण डांगे, आगारप्रमुख घनश्याम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाले, शहरातील वाढत्या घरपट्टीबद्दल नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी यातून निश्चित मार्ग काढतील. आपण ज्या अडी-अडचणी मांडल्या आहेत. त्यांचा पाठपुरावा करून ही कामे पूर्ण करू. मध्यंतरी कोरोनाच्या काळात विकास कामांची गती मंदावली होती. आता परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने विकासकामांना गती देऊ. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. सर्वांनी योग्य काळजी घ्यावी.
नगरसेवक आनंदराव मलगुंडे, जयश्री माळी, सुनीता सपकाळ, युवकचे कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, पुष्पलता खरात, राजू अडसुळ, प्रवीण पाटील, ॲड. संभाजी जाधव, संतोष जाधव यांनी नागरिकांचे प्रश्न मांडले. यावेळी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, कमल पाटील, बाळासाहेब पाटील, शंकरराव पाटील, आनंदराव पाटील, ॲड. संपतराव पाटील, पीरअली पुणेकर, गोपाळ नागे, परेश पाटील, सुरेश हवालदार, श्यामसुंदर पाटील, रतन रायगांधी, शैलजा जाधव, योगीता माळी, अलका शहा, अंकुश जाधव उपस्थित होते.
फोटो : ०५ इस्लामपुर १
ओळी : इस्लामपूर येथील कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रतीक पाटील, ॲड. चिमण डांगे, भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे उपस्थित होते.