‘राखीव’मधून जयंत पाटील यांचेच समर्थक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:27+5:302021-06-25T04:19:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णेच्या निवडणुकीत भटक्या-विमुक्त जाती-जमाती या राखीव गटामधून तिन्ही पॅनलचे उमेदवार वाळवा तालुक्यातील आहेत. हे ...

Jayant Patil's supporters from 'Rakhiv' face to face | ‘राखीव’मधून जयंत पाटील यांचेच समर्थक आमने-सामने

‘राखीव’मधून जयंत पाटील यांचेच समर्थक आमने-सामने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णेच्या निवडणुकीत भटक्या-विमुक्त जाती-जमाती या राखीव गटामधून तिन्ही पॅनलचे उमेदवार वाळवा तालुक्यातील आहेत. हे तिघेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समर्थक आहेत. तिघेही धनगर समाजाचे असल्याने कोण बाजी मारणार, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

सहकार पॅनलचे उमेदवार अविनाश खरात आणि संस्थापक पॅनलचे उमेदवार नितीन खरात हे दोघेही खरातवाडी (ता. वाळवा) येथील आहेत. या दोघांनी ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपर्यंत राजकीय प्रवास केला आहे. वाळू व्यवसाय हा त्यांचा जोड उद्योग आहे. अविनाश खरात माजी सरपंच असून त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. कृष्णेच्या गत निवडणुकीत ते रयत पॅनलकडून उभे होते. यावेळी मात्र त्यांना सहकार पॅनलकडून उमेदवारी मिळाली आहे. संस्थापक पॅनलने माजी संचालक नितीन खरात यांना उमेदवारी देऊन अविनाश खरात यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोघेही जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

सहकार आणि संस्थापक पॅनलला शह देण्यासाठी रयत पॅनलने इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तोडीस तोड उमेदवार असल्याने आता राखीव गटामध्ये चुरस निर्माण झाली आहे. मलगुंडे इस्लामपूरचे विद्यमान नगरसेवक आहेत. धनगर समाजात त्यांचा संपर्क आहे. प्रारंभापासून कृष्णेच्या राजकारणात त्यांनी यशवंतराव मोहिते, मदनराव मोहिते यांना साथ दिली आहे. सध्या मदनराव मोहिते सहकार पॅनलमध्ये आहेत, परंतु मलगंडे यांंनी मोहिते घराण्यावरील निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळेच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी त्यांना उमेदवारी देऊन बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात पॅनलला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Jayant Patil's supporters from 'Rakhiv' face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.