देवराष्ट्रेत विलगीकरण केंद्रासाठी ‘जयंत थाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:11+5:302021-06-02T04:21:11+5:30

कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयदीप यादव यांनी स्वखर्चातून जयंत थाळी उपक्रम सुरू केला आहे. यामुळे लोकसहभागातून कोरोना रुग्णांच्या ...

'Jayant Thali' for Devarashtra Separation Center | देवराष्ट्रेत विलगीकरण केंद्रासाठी ‘जयंत थाळी’

देवराष्ट्रेत विलगीकरण केंद्रासाठी ‘जयंत थाळी’

Next

कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे

अध्यक्ष जयदीप यादव यांनी स्वखर्चातून

जयंत थाळी उपक्रम सुरू केला आहे. यामुळे लोकसहभागातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रांना मदत होत आहे.

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील विलगीकरण केंद्रातील रुग्णांना जयंत

थाळी देऊन प्रारंभ करण्यात आला.

आमदार अरुण लाड व

जिल्हा परिषद सदस्य शरद लाड

यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव

तालुक्यातील अनेक गावांमधील

संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कडेगाव तालुक्यातील २०० रुग्णांना सकाळी आणि संध्याकाळी जयंत थाळी देण्यात येते, असे जयदीप यादव यांनी सांगितले.

यावेळी देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, क्रांती कारखान्याचे संचालक नारायण पाटील, प्रमोद महिंद, दिलीप पाटील, वैभव पवार, संदेश जाधव,

परवेझ तांबोळी आदी उपस्थित होते.

Web Title: 'Jayant Thali' for Devarashtra Separation Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.