जयंत दारिद्र्य निर्मूलनातून रोजगार वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:31+5:302020-12-17T04:51:31+5:30
इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ ...
इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केल्याची माहिती युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वयंरोजगार वाढायला हवा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात वाळवा तालुक्यातील १९ छोट्या व्यावसायिकांना अर्थसाहाय्य, तर ११ व्यक्तींना विविध आजारांसाठी त्यांच्याहस्ते आर्थिक मदत देण्यात आली. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर उपस्थित होत्या.
प्रतीक पाटील म्हणाले, तुमचा व्यवसाय छोटा आहे, म्हणून निराश होऊ नका. मन लावून व्यवसाय करा. हाच तुमचा व्यवसाय तुमच्या कुटुंबाचा आधार बनेल.
प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके, सुवर्णा पाटील, अलका माने, मनीषा पेठकर, शिवाजी चोरमुले, स्वरूप मोरे, अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे उपस्थित होते.
चाैकट
यांना मदत...
आष्टा येथील सायराबानू मुलाणी, शिवकुमार हाबळे, दत्तात्रय आवटे, राजू वारे, मोहसीन तांबोळी, समीर मुजावर, अश्विनी हालुंडे, गीता शिंदे, विनया कुलकर्णी, रमजान इनामदार (शिगाव), बाबू चव्हाण (गोटखिंडी), बाळासाहेब आगा (साखराळे), सुवर्णा साळुंखे (कापूसखेड), मधुमालती साठे (वाटेगाव), राजाराम सूर्यवंशी (कासेगाव), पांडुरंग चव्हाण (नेर्ले), सविता सुर्वे, साधना सुर्वे (नरसिंहपूर) यांना व्यवसाय करण्यास अर्थसाहाय्य करण्यात आले.
फोटो-१६इस्लामपुर१
फोटो ओळी-
इस्लामपूर येथे जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाचे प्रतीक पाटील यांच्याहस्ते गरजूंना अर्थसाहाय्य करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, रोझा किणीकर, संग्राम फडतरे, माणिक शेळके, सुभाषराव सूर्यवंशी उपस्थित होते.