इस्लामपुरात जयंतराव-सदाभाऊंची खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:57 AM2019-11-20T00:57:21+5:302019-11-20T00:57:53+5:30
राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर यांनी इस्लामपूर येथे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यात १५ मिनिटे खलबते झाली.
विटा : राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर यांनी इस्लामपूर येथे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यात १५ मिनिटे खलबते झाली.
विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांना राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. परंतु, शिवसेना आणि भाजप युतीमुळे राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांनी आ. बाबर यांना ताकद दिली. परिणामी, बाबर यांचा २६ हजार मतांनी विजय झाला. निकालानंतर सेना-भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाल्याने शिवसेनेने राष्टÑवादी व कॉँग्रेसचा पाठिंबा घेऊन महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेतून बाबर यांच्या मंत्रिपदाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात राष्टÑवादीचीही भूमिका महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, किरण तारळेकर, विश्वनाथ कांबळे, किसन जानकर या नेत्यांनी इस्लामपूर येथे जाऊन भेट घेतली. दिल्लीला जाण्यासाठी आ. पाटील यांची घाई सुरू असतानाही पंधरा मिनिटे खलबते झाली.
या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. ही भेट राजकीय नसून, आ. पाटील यांना केवळ शुभेच्छा देण्यासाठी झाल्याचे राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.