पक्षवाढीसाठी जयराज पाटील यांनी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:28 AM2021-01-25T04:28:12+5:302021-01-25T04:28:12+5:30

कामेरी : भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जयराज पाटील यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश ...

Jayaraj Patil should work for party growth | पक्षवाढीसाठी जयराज पाटील यांनी काम करावे

पक्षवाढीसाठी जयराज पाटील यांनी काम करावे

Next

कामेरी : भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जयराज पाटील यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी काम करण्याची संधी मिळाली. वाळवा-शिराळा तालुक्यातील भाजपा पक्ष वाढीसाठी त्यांनी काम करावे, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांनी केले.

कामेरी (ता. वाळवा) येथील माजी सरपंच जयराज चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाडिक बोलत होते.

जयराज पाटील म्हणाले, युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त युवकांना युवा मोर्चामध्ये सहभागी करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. राज्य पातळीबरोबरच शिराळा-वाळवा तालुक्यातील भाजपा पक्ष वाढीसाठी राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांच्यासोबत काम करणार.

यावेळी प्राचार्य महेश जोशी, शिवाजी जानकर, संपत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, किरण नांगरे, माजी उपसरपंच रणजित पाटील, धनाजी पाटील, शशिकांत पाटील, दिग्विजय मोहन जाधव, संताजी पाटील, अरविंद खंडागळे, गुंडा माली, आनंदराव शेलार,अशोक जाधव, सुभाष जाधव, जगदीश पाटील उपस्थित होते. दिलीप जाधव यांनी आभार मानले.

फोटो ओळी २४०१२०२१-आयएसएलएम- कामेरी सत्कार न्यूज

कामेरी (ता. वाळवा) - जयराज पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सम्राट महाडिक यांनी सत्कार केला. यावेळी दिलीप जाधव, शशिकांत पाटील, धनाजी पाटील, रणजित पाटील, संताजी पाटील उपस्थित होते.

Web Title: Jayaraj Patil should work for party growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.