७५ वर्षाचे जयवंतराव मोटारसायकलने गेले अमरनाथ यात्रेला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:17 PM2022-07-05T20:17:18+5:302022-07-05T20:17:43+5:30

आतापर्यंत त्यांनी, जोतिबा, पंढरपूर, गणपतिपुळे, शिर्डी अशा अनेक तीर्थक्षेत्र पायी, सायकलने केले आहे.

Jayawantrao Kedarrao Chavan from Miraj taluka went to Amarnath Yatra on a motorcycle | ७५ वर्षाचे जयवंतराव मोटारसायकलने गेले अमरनाथ यात्रेला

७५ वर्षाचे जयवंतराव मोटारसायकलने गेले अमरनाथ यात्रेला

googlenewsNext

कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजमधील हिम्मत बहहदादर चव्हाण घराण्यातील जयवंतराव केदारराव चव्हाण सध्या मोटारसायकलने अमरनाथ यात्रेला गेले आहेत. ही एक अचंबित करणारी गोष्ट आहे; पण वीस वर्षांहून अधिक काळ ते देशात कधी पायी, कधी सायकलने तर सध्या मोटारसायकलने अमरनाथ यात्रा करीत आहेत.

जयवंतराव चव्हाण हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात ओळखले जात आहेत. घरची दहा एकर बागायती शेती, मुलाचा मोठा व्यवसाय हे सध्या जरी दिसत असले तरी पूर्वी काबाडकष्ट केले आहेत. शरीरसंपदा मिळविली म्हणून आज वयाच्या ७५ वर्षी ते एकटेच मोटारसायकलने अमरनाथला गेले आहेत. आतापर्यंत त्यांनी, जोतिबा, पंढरपूर, गणपतिपुळे, शिर्डी अशा अनेक तीर्थक्षेत्र पायी, सायकलने केले आहे. तिरुपती बालाजीलाही ते गेले होते. घरातील सर्व लोकांचे सहकार्य मिळते. त्याचप्रमाणे भावकीतील मुले, भाऊ आदी लोक सहकार्य, प्रोत्साहन देतात, असे ते सांगतात.

ऊन, वारा, पाऊस, थंडी याची कोणतीही तमा न बागळताता ते अखंडपणे फिरताना दिसत आहेत. हजारो किलोमीटर प्रवास त्यांनी आजपर्यंत केला आहे. अजूनही तब्बेत चांगली ठेवली आहे.

व्हिडिओची मोठी चर्चा

सध्या ते जम्मूहून पुढे जातानाच एका वृत्त वाहिनीच्या हिंदी भाषिक पत्रकाराने प्रसारित केलेला व्हिडिओ संपूर्ण जिल्हाभर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मोठी चर्चा सुरू आहे.

Web Title: Jayawantrao Kedarrao Chavan from Miraj taluka went to Amarnath Yatra on a motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.