जयश्रीताई महिला काँग्रेस अध्यक्षपदी
By admin | Published: June 26, 2016 11:26 PM2016-06-26T23:26:09+5:302016-06-27T00:40:24+5:30
पत्र दाखल : मदनभाऊ गटाला दिलासा
सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी रविवारी जयश्रीताई पाटील यांची निवड करण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीने तसे पत्र रविवारी पाठविले असले तरी, विद्यमान पदाधिकाऱ्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती. या निवडीने मदन पाटील गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सांगली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यापूर्वी करोली (एम) येथील तानुबाई पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून जयश्रीताई पाटील यांना अनेक बैठकांना डावलले जात होते. नुकत्याच झालेल्या मिरज तालुक्याच्या बैठकीला त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. याबाबत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेही तक्रार केली होती. चव्हाण यांनी याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळेच जयश्रीतार्इंची निवड महिला काँग्रेसच्याजिल्हाध्यक्षपदी केल्याची चर्चा आहे. मोनिका पाटील यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते.
जयश्रीतार्इंच्या निवडीने मदन पाटील गटाला मोठा दिलासा मिळाला असून निर्णय प्रक्रियेत आता या गटाचे महत्त्व वाढणार आहे. मदन पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या गटाला हा धक्का आहे. (प्रतिनिधी)