दुष्काळग्रस्तांना लेखनीतून जयवंत आदाटेंनी न्याय दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:59+5:302021-05-27T04:27:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : दुष्काळी जत तालुक्यातील लोकभावना प्रखरपणे वेळोवेळी लोकमतच्या माध्यमातून मांडण्याचे काम दिवंगत पत्रकार जयवंत ...

Jaywant Adate gave justice to the famine victims through his writings | दुष्काळग्रस्तांना लेखनीतून जयवंत आदाटेंनी न्याय दिला

दुष्काळग्रस्तांना लेखनीतून जयवंत आदाटेंनी न्याय दिला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शेगाव : दुष्काळी जत तालुक्यातील लोकभावना प्रखरपणे वेळोवेळी लोकमतच्या माध्यमातून मांडण्याचे काम दिवंगत पत्रकार जयवंत आदाटे यांनी केले. आदाटे यांच्या निधनाने जो त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे, त्यात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय व इतर पातळीवर शक्य असेल ती सर्व मदत करणार आहे, असे मत तहसीलदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.

जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच मारुती पवार उपस्थित होते. जत तालुक्यातील पत्रकारांनीही आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार म्हणाले, लोकमतचे पत्रकार जयवंत आदाटे व वृत्तपत्र विक्रेते दिनेश साळुंखे यांचे निधन झाले. या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी तालुक्यातील सर्वांनी मिळून सर्वपक्षीय फंड तयार करून जी काही रक्कम तयार होईल, ती या दोन्ही कुटुंबाकडे सुपूर्द करता येईल. आर्थिक मदत व मानसिक आधारसुद्धा देणे आपले कर्तव्य आहे.

आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे म्हणाले, जयवंत आदाटे यांनी पत्रकारितेत २२ वर्षे सेवा केली. तालुक्यातील अनेक प्रश्न सातत्याने मांडले. या कालावधीत त्यांना ज्यावेळी समस्या आल्या, त्यावेळी मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो.

यावेळी पत्रकार राजू माळी, दिनराज वाघमारे, किरण जाधव, मारुती मदने, बादल सर्जे, गजानन पाटील, सुनील घाटगे, केराप्पा हुवाळे, हरी शेटे, भागवत काटकर, सोमनिंग कोळी, दानापा कोहली, संतोष पोरे, अशोक स्वामी आदी पत्रकार उपस्थित होते.

Web Title: Jaywant Adate gave justice to the famine victims through his writings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.