जयवंतराव भोसले यांची आज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:40+5:302020-12-22T04:25:40+5:30
शिरटे : कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांची आज, मंगळवारी ९६ वी जयंती साजरी ...
शिरटे : कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांची आज, मंगळवारी ९६ वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील जयवंतराव भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले जाईल.
दरम्यान, धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्यावतीने दोन केएलपीडी क्षमतेचा नवा हॅन्डसॅनिटायझर प्रकल्प आणि ४८ मेट्रिक टन क्षमतेचा सीओ २ प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन सकाळी ११.३० वाजता कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले आणि उत्तरा भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
तसेच मल्हारपेठ (ता. पाटण) येथे नव्याने सुरू होत असलेल्या सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.