जितेश भय्या... बस नाम ही काफी है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:50+5:302021-09-27T04:27:50+5:30

खरंतर जितेशभय्या यांची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ असल्याचा प्रत्यय वारंवार येतो. जितेशभय्या कदम यांच्याबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आहेत. ...

Jitesh Bhaiya ... just the name is enough! | जितेश भय्या... बस नाम ही काफी है!

जितेश भय्या... बस नाम ही काफी है!

googlenewsNext

खरंतर जितेशभय्या यांची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ असल्याचा प्रत्यय वारंवार येतो. जितेशभय्या कदम यांच्याबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याशी त्यांचं आपुलकीचे नाते आहे.

त्यांच्या अंगी असलेली धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता, झोकून देऊन काम मार्गी लावण्याची सवय, कामाचा उरक, कमालीची शिस्त, वक्तशीरपणा, कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, दूरदर्शीपणा, अभ्यासू वृत्ती, तरुणांशी मैत्री, ज्येष्ठांबद्दल आदर अशा कितीतरी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. कोणत्याही कार्यकर्त्याला आणि नागरिकाला जितेशभय्यांनी एकदा शब्द दिला की संबंधित नागरिक किंवा कार्यकर्ता हा निर्धास्त राहतो. कारण त्याला विश्वास असतो की हा भय्यासाहेबांचा शब्द आहे. यात कोणताही बदल होणार नाही. आपलं काम शंभर टक्के होईल.

जितेशभय्या जेव्हा कार्यकर्त्यांना भेटतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होतो. माजी मंत्री स्व. आ. डॉ. पतंगराव कदम यांचे आशीर्वाद, आमदार मोहनराव कदम यांचे मार्गदर्शन तसेच सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे प्रोत्साहन डॉ. जितेशभय्या यांना लाभले आहे. जितेशभय्या कदम यांनी आपलं नेतृत्त्व कामातून सिद्ध केले आहे.

डॉ. जितेशभय्या हे आमदार मोहनराव कदम यांचे नातू इथवर लोकांना माहिती आहे. मात्र यापलीकडे डॉ. जितेशभय्या यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे संघटन कौशल्य अफलातून आहे. या संघटन कार्यातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. डॉ. जितेश कदम हे भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे सुपुत्र आहेत. राजकारणात येणारी कोणतीही जबाबदारीही पेलण्याची ताकद डॉ. जितेश कदम यांच्यामध्ये दिसून येते. आमदार मोहनराव कदम यांच्यामध्ये जी सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे, त्याची चुणूक डॉ. जितेश यांच्यामध्ये दिसून येते.

डॉ. जितेश यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असं बारावीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. त्यानंतर सांगली येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस पूर्ण केलं. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच डॉ. जितेश कदम यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. डॉ. जितेश यांनी युवकांना संघटीत करून राजकारणाबरोबरच समाजकारणाला प्राधान्य दिले.

त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ कडेगाव तालुक्यात काढलेल्या भव्य दुचाकी रॅलीने तरुणाई रिचार्ज केली. वास्तविक डॉ. जितेश कदम रूपाने कदम कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. आता डॉ. विश्वजित कदम यांना समर्थपणे साथ देत मतदारसंघातील प्रत्येक उपक्रमात डॉ. जितेश कदम यांचा पुढाकार असतो. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलन, मोर्चा, महापूर आणि कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य लोकांना मदत अशा प्रत्येक कार्यात सक्रिय सहभागी असलेल्या डॉ. जितेश यांच्या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चा सुरु असते. डॉ. जितेश कदम हे भारती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांवर डॉ. जितेशभय्या यांचा अधिक भर असतो. पलूस कडेगाव मतदारसंघासह सांगली शहर आणि जिल्ह्यात विश्वजितेश फाउंडेशन नावाचे तरुणांचे मजबूत संघटन कार्यरत आहे. विश्वजितेश फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना आणि महापुराच्या संकटकाळी झालेले मदतकार्य खूप मोठे आहे.

‘आव्वाज कुणाचा..’ म्हटल्यावर मागून डॉ. जितेशभय्या कदमांचा असा तरुणांचा दमदार आवाज ऐकू येतो. याचे कारण असे की तरुणांमध्ये ऊठ-बस करणारा, त्यांच्याशी संवाद साधणारा, त्यांच्या समस्या जाणून घेणारा युवा नेता त्यांना लाभला आहे. नव्या पिढीच्या प्रश्नांवर विचार करणारं नवं नेतृत्व म्हणून पुढे आलेले डॉ. जितेश तरुण वर्गाला आकर्षित करत आहेत. केवळ तरुणासाठीच नव्हे तमाम समाजासाठी प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे डॉ. जितेश कदम दुर्लक्षित लोकांची विशेष दखल घेतात. सत्तेसाठी आणि मोठेपणा करण्यासाठी नव्हे तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करणारे डॉ. जितेश कदम हे सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे नेतृत्व आहे. डॉ. जितेश कदम हे राजकारणात येणाऱ्या पिढीसाठी आदर्श आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

डॉ. जितेश कदम यांच्या हाकेला तरुणवर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कारण ते जनतेचे प्रश्न सोडवण्यास सक्षम आहेत अर्थात यामागे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. डॉ. जितेश यांचे ध्येयही स्वच्छ आहे. एक खंबीर आणि साहसी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होत आहे. लोकशाहीच्या मार्गाने आणि सामाजिक भान जपत ते समाजहिताची कामे करतात.

त्यांचे पाठीशी असलेली कार्यकर्त्यांची टीम सोशल मीडियाच्या साहाय्याने क्षणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. मागील काही वर्षात डॉ. जितेश आंदोलनासाठी विशेष चर्चेत राहिले. विशेषतः महागाई, नोटाबंदी, पाणीप्रश्न यांसारखे सामाजिक प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले. तरुणवयात त्यांच्या वागण्यात जी प्रगल्भता दिसते तीच सर्वांना भावते. त्यांचं नेतृत्व खंबीर आहे. कोणतंही काम जिद्दीने, खंबीरपणे करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. डॉ. जितेश कदम यांच्याकडून तरुणांच्या अनेक अपेक्षा आहेत. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आणि त्यांच्या पाठीशी असलेले युवाशक्तीचे बळ या जोरावर डॉ. जितेश कदम राजकारणात कदम कुटुंबीयांच्या नावलौकिकास साजेशी आणि दमदार वाटचाल करतील आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल असेल. डॉ. जितेश कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

लेखक : प्रताप महाडिक

Web Title: Jitesh Bhaiya ... just the name is enough!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.