जितेश कदम यांची भारती बँकेच्या संचालकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:30 AM2021-01-08T05:30:52+5:302021-01-08T05:30:52+5:30

जितेश कदम एमबीबीएस आहेत. उच्चशिक्षित असल्यामुळे बँकेच्या विकास व वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित ...

Jitesh Kadam elected as Director, Bharti Bank | जितेश कदम यांची भारती बँकेच्या संचालकपदी निवड

जितेश कदम यांची भारती बँकेच्या संचालकपदी निवड

Next

जितेश कदम एमबीबीएस आहेत. उच्चशिक्षित असल्यामुळे बँकेच्या विकास व वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते त्यांची निवड केली आहे.

जितेश कदम म्हणाले की, दिवंगत पतंगराव कदम साहेबांनी अतिशय परिश्रमपूर्वक भारती सहकारी बँकेची स्थापना करून ती नावारूपासही आणली आहे. बँकेचा संचालक म्हणून सामान्य माणूस व शेतकरी केंद्रबिंदू

मानून विश्वास, शिस्त आणि पारदर्शक

कारभार याचा अवलंब करून नावलौकिकास साजेशी कामगिरी करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन. बँक ५० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना संचालकपदी संधी मिळाली, याचा अभिमान वाटतो.

जितेश कदम यांचा विश्वजित कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

फोटो : पुणे येथे भारती बँकेचे नूतन संचालक डॉ. जितेश कदम यांचा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Jitesh Kadam elected as Director, Bharti Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.