सांगलीत आनंदोत्सव : फटाक्यांची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 02:13 PM2019-11-27T14:13:58+5:302019-11-27T14:15:05+5:30
. महाराष्टÑाचा एकच बुलुंद आवाज, शरद पवारह्ण, ह्यआता कसं वाटतंय, गार गार वाटतंयह्ण, अशा घोषणा देत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
सांगली : राज्यातील महाराष्टÑ विकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरल्यानंतर बुधवारी सांगलीत कॉंग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. साखर व पेढेवाटप करतानाच फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांनी सरकार स्थापनेचा आनंदोत्सव साजरा केला.
सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याजवळ सकाळी पदाधिकारी जमले. त्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत याठिकाणी नागरिकांना पेढे व साखर वाटण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणीही जल्लोष करीत पेढेवाटप केले. महाराष्टÑाचा एकच बुलुंद आवाज, शरद पवारह्ण, ह्यआता कसं वाटतंय, गार गार वाटतंयह्ण, अशा घोषणा देत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
यावेळी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बिपीन कदम, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष सागर घोडके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर, शहराध्यक्ष मयुर घोडके या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ज्योती अदाटे, अनिता पांगम, लालू मेस्त्री, असिफ बावा, सुरेश यमगर, सतिश गोरे, इरफान मुल्ला, विजय जाधव, अरुण पळसुळे, मनोज भिसे, कैलास वडर, राजकुमार शिंदे आदी सहभागी झाले होते.
भाजपच्या राजकारणास चपराक!
बिपीन कदम म्हणाले की, राज्यात भाजपने ज्या पद्धतीने अत्यंत हीन राजकारण सुरू केले होते. त्या राजकारणास शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन जोरदार चपराक दिली आहे. महाराष्टÑातील तमाम जनता या नव्या सरकारमुळे आनंदी झाली आहे. कष्टकरी, शेतकरी व वंचित घटकांना न्याय देण्याचे काम नवे सरकार करणार असून महाराष