फडणवीसांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:13+5:302020-12-22T04:26:13+5:30
ते म्हणाले, केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी हा कायदा एकदा वाचण्याची गरज आहे. कडकनाथ कुक्कुटपालन ...
ते म्हणाले, केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी हा कायदा एकदा वाचण्याची गरज आहे. कडकनाथ कुक्कुटपालन हाही करार पध्दतीचा व्यवसाय होता. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. अनेकांनी आत्महत्या केल्या. करार पध्दतीची शेती फायद्याची आहे, हे कोणत्या तोंडाने सदाभाऊ सांगणार, हा आमचा सवाल आहे. शेतकरी आणि उद्योगपतीत करार झाला आणि संबंधित कंपनीने शेतीमाल घेतला नाही? तर हा वाद प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सोडवायचा आहे. त्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर न्यायालयात जाण्याची तरतूद नाही. अधिकारी उद्योगपतींच्या जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावतील. उसाला एफआरपीचे संरक्षण आहे, तसे तूर, मूग, उडीद, गहू, हरभरा या पिकांना का नाही? यात्रा काढण्यापेक्षा सदाभाऊंनी कायदा शेतकरी हिताचा होईल, यासाठी प्रयत्न करावेत.
चौकट
कडकनाथ यात्रा काढणार
आत्मनिर्भर यात्रेला उत्तर म्हणून कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेऊन आम्हाला न्याय द्या, आमचे पैसे परत द्या, असे आवाहन करत कडकनाथ यात्रा काढणार आहे. त्याची सांगता इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत करणार असल्याचा इशारा खराडे यांनी दिला.