कडेगाव राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा जाहीर निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:56+5:302020-12-30T04:36:56+5:30

वांगी : कडेगाव तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन कडेगाव तालुका ...

Kadegaon NCP's public protest against fuel price hike | कडेगाव राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा जाहीर निषेध

कडेगाव राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा जाहीर निषेध

Next

वांगी : कडेगाव तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन कडेगाव तालुका पदवीधर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप मदने याच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले.

सध्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही दिवसें-दिवस पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ केलेली आहे. या सततच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. गेले कित्येक महिने सर्वसामान्य जनता कोरोना, लाॅकडाऊन व रोजगार नसल्याने हैराण झाली आहे. या जनतेला योग्य निर्णय घेऊन दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार दरवाढीचा निर्णय जनतेवर लादत आहे तरी केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तत्काळ थांबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

यावेळी बाळासाहेब वत्रे, रमेश एडके, सोमनाथ पवार, सतीष तुपे, आबासाहेब शिदे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो-२८वांगी१

Web Title: Kadegaon NCP's public protest against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.