कडेगाव न्यूज कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींसाठी ८०.३५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:51+5:302021-01-16T04:31:51+5:30
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. ११.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत ५१.७० टक्के मतदान ...
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. ११.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत ५१.७० टक्के मतदान झाले, तर सायंकाळी दिवसअखेर ९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८०.३५ टक्के चुरशीने मतदान झाले.
तालुक्यातील शिरसगाव, सोनकिरे, अंबक, रामापूर, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हारवाडी, कोतिज या ९ गावांमध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. एकूण ९ गावांतील ७९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ७४ जागांसाठी १७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
९ ग्रामपंचायतींसाठी एकूण १९,६२३ मतदार आहेत. यामध्ये ९७०२ महिला, तर ९९२१ पुरुष मतदार आहेत. त्यापैकी १५,७६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, मतदान करून घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथके तैनात होती. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी निवडणूक कर्मचारी यांना सूचना दिल्या, तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या नेतमंडळींनीही नऊ गावांतील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
चाैकट
तालुक्यातील झालेले मतदान
शिरसगाव : ७९.८१, सोनकिरे : ७८.२०, अंबक : ८२, रामापूर : ८६.०९, शिवणी : ८३.८०, येतगाव : ७७.९७, ढाणेवाडी ८४.८६, कान्हारवाडी : ८७.१५, कोतिज : ५८.४३.