कडेगाव तालुक्यात ओढे, नाले तुंडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:16+5:302021-07-23T04:17:16+5:30
कडेगाव : कडेगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाने लोकांची दैना उडवली ...
कडेगाव : कडेगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाने लोकांची दैना उडवली आहे. तालुक्यातील अनेक लहान-मोठे ओढे, नाले तुंडुंब भरले आहेत. कडेगाव तलावही ओसंडून वाहत आहे.
या तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात येथील कोतमाई ओढ्याला आल्याने ओढ्याला पूर आला असून, शहरातील नागपूर वसाहतीचा संपर्क तुटला आहे. शहरातील ओढ्याच्या पात्राजवळ असलेल्या बालोद्यानमधील खेळणी पाण्याखाली गेली आहेत. चिंचणी येथील तलावही तुडुंब भरला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील येरळा, नांदनी नद्यांसह कडेगाव, कोतमाई ओढा, सोनहिरा ओढा, महादेव ओढा आदी लहान-मोठ्या ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
फोटो : कोतमाई ओढ्याला पूर आला आहे.