मिरजेतील जाेडप्याच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:20+5:302021-04-30T04:33:20+5:30
खॉजा वसाहतीत राहणारे सलीम गौससाहेब सय्यद उर्फ भटकळ (वय ४७) व मरियम सय्यद उर्फ नदाफ (वय ...
खॉजा वसाहतीत राहणारे सलीम गौससाहेब सय्यद उर्फ भटकळ (वय ४७) व मरियम सय्यद उर्फ नदाफ (वय ४०) यांनी मंगळवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सलीम हा रेल्वेस्थानक परिसरात पानपट्टीत काम करत होता. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. पत्नी मरियम आजारी होती. बचतगटाचा कर्जाचा हप्ता थकीत होता. घराचा खर्च चालविणे कठीण झाल्याने आर्थिक विवंचनेत दोघांनीही घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज होता. सलीम हा दोरीला लटकला होता, तर मरियम ही जमिनीवर मृतावस्थेत पडलेली होती. दोघांच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात मरियम हिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मृत सलीम सय्यद याच्याविरुद्ध मरियम हिच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गांधी चाैक पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.