कामेरीत वादळी वारे, पावसाने विजेच्या खांबावर झाड पडल्याने चार खांब वाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:18 PM2020-06-02T12:18:38+5:302020-06-02T12:21:14+5:30
कामेरी/ सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने कामेरी गावठाण फिडरकडे जाणाºया वीजेच्या खांबावर ...
कामेरी/सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने कामेरी गावठाण फिडरकडे जाणाºया वीजेच्या खांबावर गावओढ्याकडेचे झाड पडल्याने शिवपुरी रोडलगतचे चार वीजेचे खांब पडले आहेत. त्यापैकी एक खांब मोडला असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत. ताण पडल्याने डी.पी.चे खांबही कलले आहेत.
दरम्यान, या ११ के.व्हीच्या डीपीवरून विदुयत पुरवठा केल्या जाणाºया कामेरी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, तुजारपूर या गावचा विद्युत पुरवठा आज दुपारपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीच्या कामेरी शाखेच ेसहाय्यक अभियंता जितेंद्र पाटील यांनी दिली. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र कर्मचारी अथवा या परिसरातील ग्रामस्थ यांना कोणतीही इजा झालेली नाही.
स्थानिक वीज वितरणचे कर्मचारी ग्रामस्थांच्या मदतीने ओढ्यानजीक रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून विजेच्या तारा सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र मोडलेला खांब बदलणे आणि इतर तीन खांब उभे करून डीपीचे खांब पूर्ववत करून विजेच्या तारा जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ही दुरुस्ती होऊन चार गावचा विद्युत पुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होण्याची शक्यता नाही. यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत असे जितेंद्र पाटील यांनी सांगितले,
कामेरीत विजेच्या खांबांवर झाड पडल्याने चार खांब पडले असून वीज पुरवठा बंद झाला आहे.